breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

बाबांनो, मॅच फिक्सिंग करू नका: अजितदादांचे राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना आवाहन 

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राज्यतील आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी कामाला लागा. पण, रात्री एक दिवसा एक वागायचं नाही. बाबांनो कोणीही मॅच फिक्सिंग करू नका, असे म्हणत पार्थ पवार यांचं प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले आहे.
पवार पुढे म्हणाले, देशात अच्छे दिनचा भ्रमनिरास झाला. चौकीदार चोर है, हे लोकांना पटू लागलं आहे. राफेलची कागदं चोरीला जातात. हाय कोर्टात धनगर समाजाच्या आरक्षणाची कागदं गहाळ झाल्याचं सांगितलं जातंय.  देशाच्या इतिहासात नव्हती एवढी बेकारी आज वाढली आहे. माणून माणसात राहिला नाही. जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तणाव निर्माण झाला आहे. नोटाबंदीमुळे व्यावसायिकांचा धंदा उठला आहे. नितीन गडकरी यांनी त्यांना काम करू दिलं जात नाही, हे कबुल केलंय. सुषमा स्वराज म्हणाल्या पुन्हा निवडणुकीला उभारणार नाही. अशा अवस्थेत देशाचं काय होणार, म्हणून आघाडी सरकारला निवडायचे आहे.  समविचारी लोकांना एकत्र आणून राज्यातील 48 जागा कशा निवडून आणता येतील, हे पाहावे लागेल. कोल्हापूरपासून ते चंद्रपूरपर्यंत प्रचाराला लागायचं.
  • मागच्यावेळी राहूल नार्वेकर यांच्याबाबतीत अपयश आले. तर, शिरुरमधून विलास लांडे अनेकजण इच्छुक होते. जागा एक असते मागणारे अनेकजण असतात. म्हणून अमोल कोल्हे यांना उमेदवारी त्यांना दिली. यावेळी अमोल कोल्हे यांना लोकसभेत पाठवायचंच असा निर्धार करा. शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांना सांगण्याचं काम कोल्हे यांनी केलं आहे.
भाजपने फक्त राजकीय पोळी भाजून घेतली – पवार 
पोटाची खळगी भरण्याची कामगार लोकं या शहरात आली. हिंजवडीत नोकरीच्या निमित्ताने तरुण शहरात आले. कामगारांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवडचा विकास करत असताना पक्षाचे स्थानिक पदाधिका-यांनी खंबीर भूमिका घेतली. त्यामुळे मोठमोठे रस्ते झाले. विकास कामांचे पवार साहेबांनी भूमीपूजन केलं. दहा वर्ष पालकमंत्री असताना करोडो रुपयांचा पैसा शहरात आणला. पिंपरी-चिंचवडमध्ये घरांची विक्री होत नाही. रिंगरोड, घरे, शास्ती करांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासने दिली. त्यातील स्वतःची राजकीय पोळी भाजपच्या लोकांनी भाजून घेतली.
राम मंदिर बांधणं, येड्यागबाळ्याचं काम नाही – पवार
शिवसेना खोटं बोलत आहे. 25 वर्ष भाजपसोबत राहिल्याची सडली, हे उध्दव ठाकरे यांनी सांगितलं. पंढरपुरला जाऊन दर्शन घेतलं. निवडणूक आली की राम जागा होतो. स्वतःच्या वडिलांचं स्मारक करता येत नाही. तिथं राम मंदिर काय बांधणार आहे. हे येड्यागबाळ्याचं काम नाही.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button