breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन, नेटकरी वैतागले

मुंबई – तुमच्या मोबाईलमधील फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम चालत नाही आहे का? घाबरू नका सोशल चॅटिंग साईट्स ह्या तुमच्याच फोनमध्ये नाही संपूर्ण जगभरात बंद पडलं झाली होती. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामची सेवा काही काळासाठी बंद झाली होती. सध्या ही सेवा विस्कळीत असून सेवा पूर्ववत करण्याचे तातडीनं प्रयत्न सुरू आहेत.

फेसबुक, व्हॉट्सअॅप इन्स्टाग्रामवरून मेसेज पाठवणं आणि मेसेज तुम्हाला मेसेज येणं बंद झालं होतं. सध्या ही सेवा विस्कळीत आहे. अॅप बंद होण्याची कारणं काय आहेत याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही.

14 एप्रिल रोजी दुपारी फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम या तिन्ही सोशल साइट डाऊन असल्यानं नेटकरी वैतागले. जगभरातून सर्व्हर डाऊन असल्याचा अनेक तक्रारी आल्या आहेत. या महिन्यात सर्व्हर डाऊन होण्याची ही दुसरी घटना आहे. या आधी २४ तासांसाठी फेसबुकची सेवा डाऊन होती. नेटकऱ्यांना फेसबुकवर अकाऊंट उघडता येत नव्हतं.  त्यामुळे नेटकऱ्यांचा हिरमोड झाल्याचं पहायला मिळाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button