breaking-newsआंतरराष्टीय

फेसबुकच्या ३ कोटी युजर्सचा डेटा लीक

केंब्रिज अॅनालिटीकाच्या डेटा चोरी प्रकरणानंतर फेसबुक चांगलंच वादात सापडलं होते. हे प्रकरण शांत होते ना होते तोच फेसबुकसमोर आणखी एक मोठी अडचण उभी राहिली आहे. फेसबुकच्या २ कोटी ९० लाख युजर्सचा डेटा हॅकर्सने चोरल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुकनेही या वृत्ताला दुजोरा दिला असून एफबीआय याप्रकरणी पुढील तपास करत आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही ५ कोटी अकाऊंटसची माहिती लीक झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा माहिती लीक झाल्याने फेसबुक वापरणे धोक्याचे असल्याचे समोर आले आहे.

केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात युजर्सचा डेटा चोरून त्याचा गैरवापर केल्याचेही समोर आले होते. त्यानंतर अशाप्रकारे जगभरातील कोट्यवधी लोकांची माहिती लीक होत असेल तर हे नक्कीच धोक्याचे असल्याचे समोर आले होते. या सर्व प्रकरणावरुन फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग याने युजर्सची जाहीर माफीही मागितली होती. युजर्सची नाव, पत्ता अशी प्राथमिक माहिती चोरीला गेल्याचे समोर आले होत. तर आता १ कोटी चाळीस लाख युजर्सची फेसबुक प्रोफाइलवर असणारी वैयक्तिक माहिती चोरीला गेल्याचे बोलले जात आहे. याआधी झालेल्या हॅकींगमध्ये ‘View As’ या फिचरच्या माध्यमांतून हॅकर्सने माहिती चोरली आहे. सुरक्षेचा विचार करून फेसबुकने ‘View As’ हे फिचर काढून टाकले आहे. हॅकर्सने ‘View As’ या फिचर्सच्या माध्यमांतून एक्सेस टोकन चोरले होते.

समाजमाध्यमांतील ‘फेसबुक’च्या वाढत्या लोकप्रियतेला तगडा पर्याय म्हणून अमेरिकन कंपनीने सात वर्षांपूर्वी ‘गुगल प्लस’ची निर्मिती केली होती. परंतु मार्च २०१८ मध्ये गुगल प्लसवरूनही ५ लाख लोकांचा गोपनीय डेटा चोरीला गेल्याचं गुगलच्या निर्दशनास आलं होतं. २०१५ पासून ही डेटा चोरी सुरू होती. त्यानंतर गुगलचं सायबर सुरक्षा पथक कामाला लागलं. काही दिवसांपूर्वी सायबर सुरक्षा पथकाने आपलं कार्य चोख केलं असून आता गुगल प्लसवरचा डेटा सुरक्षित आहे असं स्पष्टीकरण गुगलने दिलं होतं. मात्र फेसबुकच्या डेटा लीक प्रकरणामुळे सोशल नेटवर्किंग साइट्सवरील सामान्यांच्या डेटाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button