breaking-newsक्रिडा
फिफा विश्वचषक : बेल्जियमने पनामाचा 3-0 ने केला पराभव
रशिया – फिफा विश्वचषक स्पर्धेत बेल्जियमने पनामावर 3-0 ने विजय मिळवला. या सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघ गोलशून्य बरोबरीत होते. मात्र, ड्रिएस मर्टन्सने 47व्या मिनिटाला गोल करुन बेल्जियमचे खाते उघडले.
पनामा संघ हा फुटबॉल विश्वचषकात प्रथमच सहभागी झाला होता. सामन्याच्या सुरुवातीला बेल्जियमची सामन्यावर पकड होती. मात्र, यानंतर पनामा संघानेही आक्रमक खेळी केली. नवीन पनामा संघाला बेल्जियमला कढवी झुंज द्यावी लागली. मात्र, रोमेलू लुकाकूने 69व्या मिनिटाला हेडरवर बेल्जियमचा दुसरा गोल झळकावला. यानंतर 75व्या मिनिटालाच ईडन हेझार्डच्या पासवर त्याने आणखी एक गोल करुन बेल्जियमला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली.