breaking-newsमनोरंजन

प्रदर्शनाची तारीख बदलण्यासाठी ‘मणिकर्णिका’वर ‘ठाकरे’चा दबाव नाही – कंगना

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ चित्रपट या महिन्यात २५ तारखेला प्रदर्शित होत आहे. याच तारखेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’देखील प्रदर्शित होत आहे. ‘ठाकरे’च्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी इम्रान खानच्या ‘चीट इंडिया’नं आपल्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. मात्र, अशा प्रकारे प्रदर्शनाची तारीख बदलण्याची आपल्याला कोणीही विनंती केली नाही किंवा आपल्यावर कोणाचाही दबाव नसल्याचं कंगनानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट २५ तारखेला ‘ठाकरे’ चित्रपटासोबतच प्रदर्शित होईल हे जवळजवळ निश्चित झालं आहे.

नुकताच ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ चित्रपटातील गाण्यांचा लाँचिग सोहळा पार पडला. यावेळी कंगनाला प्रदर्शनाची तारीख बदलणार का यासंबधी विचारण्यात आलं. ‘चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदला असं आम्हाला कोणीही सांगितलं नाही किंवा तशी विनंतीही आम्हाला केली नाही. दोन चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होऊ शकतात. आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही’, असं कंगनानं पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केलं आहे.

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात कंगना राणौत प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शिकेच्या भूमिकेतही कंगना आहे. याव्यतिरिक्त अतुल कुलकर्णी, अंकिता लोखंडे यांसारखे अनेक कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button