breaking-newsमहाराष्ट्र

प्रतीकच्या मारेकऱ्याच्या अटकेसाठी मंगळवेढय़ात अर्धनग्न आंदोलन

सोलापूर – मंगळवेढा तालुक्यातील प्रतीक शिवशरण याचे अपहरण करून खून झाल्याच्या घटनेस १३ दिवस उलटले तरी मारेकऱ्यांचा तपास अद्यापि लागला नाही. मारेकऱ्यांना अटक होण्यासाठी तसेच हा गंभीर गुन्हा नोंदविण्यास विलंब लावल्याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करावे आदी मागण्यांसाठी गेले सात दिवस मंगळवेढय़ात जनहित शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. याच आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून अर्धनग्न आंदोलनही करण्यात आले.

मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथे राहणाऱ्या प्रतीक शिवशरण या बालकाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. पोलिसांत गुन्हा नोंद झाल्यानंतरही गुन्हय़ाचा छडा लागला नाही. अखेर पाचव्या दिवशी प्रतीकचा मृतदेह माचणूरजवळ आढळून आला. त्याचे पाय तोडण्यात आले होते. डोक्यावरचे केसही कापण्यात आले होते. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा, असा कयास व्यक्त होत आहे. तथापि, या गुन्ह्य़ातील मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अद्यापि यश आले नाही.

या संवेदनशील घटनेमुळे माचणूर येथे गावकऱ्यांनी दिवाळी साजरी केली नाही. गावातील भीमनगरातील शोककळा कायम आहे. प्रतीकचे अपहरण झाले तेव्हा तो  गुन्हा दाखल करण्यास मंगळवेढा पोलिसांनी विलंब लावला, असा जनहित शेतकरी संघटनेचा आरोप आहे. प्रतीकच्या मारेकऱ्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, संबंधित कर्तव्यचुकार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याचीही खातेनिहाय चौकशी करावी, या मागण्यांसाठी  जनहित शेतकरी संघटनेने गेल्या गुरुवार, १ नोव्हेंबरपासून मंगळवेढय़ात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. या अर्धनग्न आंदोलनात जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांच्यासह डॉ. बाळासाहेब सरवळे, दामाजी मोरे, अमोल माळी, येताळा खरबडे, आबा सावंजी, मधुकर कोंडुभैरी, सुखदेव डोरले, पप्पू दत्तू आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. गेले सात दिवस हे आंदोलन सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button