breaking-newsपुणे

पुणेकरांच्या सेवेत पीएमपीकडून 25 इलेक्ट्रीक बस

पुणे : पुणेकरांच्या सेवेत आजपासून इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत  पीएमपीकडून 25 इलेक्ट्रिक बसची खरेदी करण्यात आली असून, नुकतीच त्यांची चाचणी घेण्यात आली होती. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. पहिल्या टप्प्यात या 25 बस पुण्यातील 3 मार्गांवर आणि पिंपरी चिंचवडच्या चार मार्गांवर धावणार आहेत. या बसमुळे प्रदूषण कमी होऊन पुणेकरांचा प्रवास प्रदूषणमुक्त होणार आहे.

पीएमपीने 25 इलेक्ट्रॉनिक बस खरेदी केल्या आहेत. या बसची चाचणी काही महिन्यांपूर्वी घेण्यात आली होती. आज  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. या बस संपूर्ण इलेक्ट्रॉनिक असून यामुळे प्रदूषण रोखले जाणार आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात 500 ई-बस खरेदी करण्यात येणार आहेत. यापैकी पहिल्या टप्यात शहरात 25 बस धावणार आहेत. नव्याने येणाऱ्या ई-बस दोन्ही महापालिका हद्दीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या ई- बस चार्ज करण्यासाठी भेकराईनगर आणि निगडी डेपो येथे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी या बस चार्ज करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.

पुण्यातील मल्टीमोडल इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब चे भूमिपूजन तसेच स्मार्ट इलेक्ट्रिक बस प्रकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, मानवसंसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे,  महापौर मुक्ता टिळक, पीएमपीएलच्या अध्यक्षा नयना गुंडे आदी उपस्थित होते.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button