breaking-newsराष्ट्रिय

पुढाऱ्यांना वाकून नमस्कार करू नका, आई वडिलांना करा-अजित पवार

पुढाऱ्यांना वाकून नमस्कार करू नका पुढारी आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. स्वतःच्या आई वडिलांना किंवा लग्न झालं असेल तर सासू सासऱ्यांना नमस्कार करा असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थी मेळाव्यात तरूणांना दिला. नियुक्ती पत्रक वाटपाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी एका विद्यार्थ्याने अजित पवार यांना नमस्कार केला. तोच धागा पकडून अजित पवार यांनी पुढाऱ्यांना वाकून नमस्कार करू नका असा सल्ला दिला आहे. पुढाऱ्यांची कुंडली पाहिली तर तुम्हाला वाटेल कुठून अवदसा आठवली आणि यांच्या पाया पडलो असेही अजित पवारांनी म्हटले आहे.

View image on TwitterView image on Twitter

Ajit Pawar

@AjitPawarSpeaks

आज, पिंपरी-चिंचवडमधल्या मध्यवर्ती कचेरीच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. त्यासोबतच विद्यार्थी मेळाव्याला हजेरी लावली आणि तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यावर तोडगा काढण्याचा विश्वास विद्यार्थ्यांना दिला.

33 people are talking about this

शिरूर लोकसभा मतदार संघात उच्च शिक्षित असलेल्या अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी कडून उमेदवारी देण्यात आली. पार्थ तो तर अविवाहित (बॅचलर) आहे त्याला संधी देण्यात आली. काही लग्न झालेले उमेदवार लोकसभेत गेले पाहिजेत तसेच अविवाहित पण गेले पाहिजेत. अविवाहित तरुणांचं देखील कोणीतरी प्रतिनिधित्व केलं पाहिजे.त्यांच्याही समस्या आहेत त्या लोकसभेत मांडल्या पाहिजेत असं अजित पवार म्हणताच हशा पिकला. पुढे बोलताना पवार म्हणाले, गंमतीचा भाग सोडून द्या पण प्रत्येक वयोगटातील तरुणांच्या आणि व्यक्तीच्या समस्या आहेत.

दोन मंत्र्यांच्या समोर तीन वेळेस आमदार असलेल्या आमदाराला जळगावच्या जिल्हा अध्यक्षांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली.दोघे ही रुग्णालयात उपचार घेत आहेत. ही भाजपाची संस्कृती अहमदनगर येथे खासदार दिलीप गांधी यांना भाषणदरम्यान बोलू दिलं नाही, ते रडले. एकेकाळी मंत्री आणि १५ वर्ष ते खासदार असणारे गांधी रडले की मला बोलू देत नाहीत. ही काय लोकशाही…त्यांना त्यांचे विचार मांडू द्या अस देखील अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button