breaking-newsपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

पीएमपीचे महिन्याला दोन बळी

पुणे – गेल्या काही दिवसांपासून पीएमपी अपघाताच्या घटनेत वाढ होत असून दोन दिवसांपुर्वी चिंचवड येथे झालेल्या अपघातात एका 29 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. 2017-18 या वर्षात पीएमपीच्या वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत तब्बल 21 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे; तर 36 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे. यामुळे पीएमपी अपघातात महिन्याला सरासरी दोन जणांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे समोर आले आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसने दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या 11 ते 12 लाखांच्या घरात आहे. यामुळे या प्रवाशांना पीएमपी बससेवा वरदान ठरत आहे. असे असले तरी विविध कारणांमुळे होणाऱ्या अपघातात लोकांना जीव गमवावे लागत आहेत. 2017-18 या गेल्या वर्षभरात पीएमपीचे 109 अपघात झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. यामध्ये 21 जणांचा मृत्यू तर 36 जण गंभीर जखमी आणि 43 जण किरकोळ जखमी झाले आहेत. महिन्यांभरापुर्वी निगडी येथे डेपोतून सुटणाऱ्या गाडीखाली वॉचमन आल्याने त्याचा मृत्यू झाला; तर दोन दिवसांपुर्वी चिंचवड येथे पीएमपीच्या गाडीखाली येऊन एका 29 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला. यामुळे पीएमपीच्या अपघाताचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
……………………..
– अपघात रोखण्यास प्रशासनास अपयश
प्रत्येक अपघातात पीएमपी चालकाचीच चूक नसून काही वेळा रस्त्यातील खड्डे, अचानक समोरून आलेले दुचाकीस्वार यांच्या चुकीमुळेही हे अपघात झाले आहेत. अशा प्रकारच्या अपघातामुळे देखील काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असले तरी मागील काही महिन्यांपासून पीएमपीची सेवा सुधारण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. बसेसच्या दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, काही प्रमाणात अपघात रोखण्यास प्रशासन कमी पडत असल्याचे दिसत आहे. अनेकदा बसचालक वेगाने गाडी चालवतात यामुळे अपघात होत असून ओव्हरटेक करणे, सिग्नल न पाळणे, प्रवासी चढ-उतार करीत असतानाच बस पुढे नेणे अशा प्रकारांनेही अपघात घडले आहेत. तर काहीवेळा इतर वाहकांच्या चुकीमुळे अपघात होत असल्याचे दिसून आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button