breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पीएमआरडीए’ने तयार केला 50 वर्षांचा मास्टर प्लॅन – आयुक्त किरण गित्ते यांची माहिती

– रस्ते, पाणी, वाहतूक व्यवस्थेसह विविध प्रकल्पाचे परिपुर्ण नियोजन 
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पीएमआरडीएच्या अंतर्गत असलेल्या सुमारे सात हजार 257 चौरस किलोमीटरच्या परिसरातील भविष्यातील पन्नास वर्षांचे रस्ते पाणी वाहतूक तसेच उभारण्यात येणारे विविध प्रकल्प यासंदर्भात नियोजन पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी आज येथे दिली. पिंपरी-चिंचवड प्रेस क्लबच्यावतीने नारायण मेघाजी लोखंडे भवन येथे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासावर होणारे परिणाम या विषयावर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
किरण दिसते म्हणाले की,  पिंपरी-चिंचवड व पुणे शहराच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यासंदर्भात एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून एक आराखडा तयार करण्यात आला आहे.  27 नोव्हेंबर रोजी हा आराखडा माहितीसाठी सादर केला जाणार आहे. पीएमआरडीए फक्त महानगरांचे दीर्घकालीन योजनांचे विकास आराखडे तयार करण्याचे काम करणार आहे त्याचबरोबर काही पायाभूत सुविधा उभे करण्याचे कामही करणार आहे. ही संस्था नियोजन व विकास या दोन तत्त्वांवर उभारण्यात आली आहे. जवळपास सात हजार 257 चौरस किलोमीटर परिसरात पीएमआरडीए विकासाचे नियोजन करणार आहे भारतात सर्वात मोठे क्षेत्र असलेले हे प्राधिकरण आहे जवळपास चाळीस ते पन्नास वर्षाचा मास्टर प्लॅन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येत असून यासाठी सिंगापूर सरकारची कंपनी सर्बना जुरोंगया कंपनीची मदत घेतली जात आहे या कंपनीला जगभरातील 140 महानगरांचा अनुभव असून त्यांच्या माध्यमातून हा मास्टर प्लॅन तयार केला जात आहे तदनंतर या मास्टर प्लान चे विकास आराखड्यात रूपांतर करण्यात येईल
पीएमआरडीए ला देण्यात आलेल्या क्षेत्रामध्ये आज सुमारे 85 लाख इतकी वस्ती असून भविष्यातील दोन कोटी लोकसंख्या अपेक्षित ठेवून हा विकास आराखडा केला जात आहे यात येथे येणाऱ्या लोकांना रोजगार त्यांना राहण्यासाठी जागा शिक्षण आरोग्य पाणी यासारख्या सुविधा याचा विचार केला जाणार आहे. येत्या 25 तारखेला प्राधिकरणाच्या वतीने सादर केल्या जाणाऱ्या  सर्वांकशवाहतूक आराखड्यात कोठे रस्ते करावयाचे किती रुंदीचा करावयाचे उड्डाणपूल किती जंक्शन किती यासंदर्भातील नियोजन करण्यात आले आहे याचबरोबर मेट्रो लाईट मेट्रो मोनोरेल याच बरोबर पुणे लोणावळा सबर्बन रेल्वे याचाही विचार करण्यात आला आहे किरण गित्ते पुढे म्हणाले की मेट्रो संदर्भात सातत्याने चर्चा चालू आहे परंतु दर ताशी दर दिशा अठरा हजार प्रवासी असतील तरच मेट्रोचा प्रकल्प परवडू शकतो अन्यथा त्याची अवस्था पीएमपीएल सारखी होऊन बसेल व हा प्रकल्प राबविण्यासाठी महानगरपालिकांना निधी द्यावा लागेल उभारण्यात आलेला बीआरटी प्रकल्प यासाठीसुद्धा दहा हजार प्रवासी असतील तरच प्रकल्प परवडू शकतो तेवढी प्रवासीसंख्या नसल्याने हा प्रकल्प तोट्यात चालला आहे
किरण गित्ते यांनी पुढे सांगितले की पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे पाण्याच्या नियोजनात संदर्भातही काम देण्यात आले आहे आपल्या जवळपासच्या धरणांमध्ये 99 टीएमसी इतका पाणीसाठा आहे पैकी तीस टीएमसी पाणी पिण्यासाठी वापरले जाते तर तेहतीस टीएमसी पाणी शेतीसाठी वापरले जाते उर्वरित पाणी उद्योग व गळती मध्ये जात आहे या संपूर्ण पाणीसाठ्याच्या वापरासंदर्भात मास्टर प्लान तयार करण्याचे काम चालू आहे लवकरच हा विकास आराखडा ही आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत
पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण छोट्या छोट्या भागांचाही विकास आराखडे तयार करून तेथील विकासाचे नियोजन करत असल्याचे किरण गित्ते यांनी सांगितले ते म्हणाले उपलब्ध जमीन एकत्र करून त्यात 20 टक्के रस्ते दहा टक्के जागा व पाच टक्के प्राधिकरणासाठी निवासी व व्यापारी केंद्रे उभारण्याकरिता वापरली जाणार आहे उर्वरित 50 टक्के जागा पद्धतीने करून वापरण्यासाठी दिले जाणार आहे हे करत असताना विकासासाठी वापरल्या जाणाऱ्या जागेचा भार कोणा एका व्यक्तीवर पडू नये अशा पद्धतीने नियोजन चालू आहे प्राधिकरण प्रथम सुविधा व नंतर विकास प्रकल्प अशा पद्धतीने काम करीत आहे
तसेच किरण गित्ते म्हणाले की हिंजवडी वाकड नाशिक फाटा चाकण असा मेट्रो मार्ग करण्याचा प्रयत्न आहे पण आम्ही केलेल्या सर्वे मध्ये वाकड ते नाशिक फाटा एवढ्यात परिसरात अपेक्षित प्रवासी संख्या उपलब्ध होऊ शकते त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही विकास आराखडा करून सर्वांसमोर ठेवणार आहोत पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात विलिनीकरण सध्यातरी अशक्य आहे अशी माहिती देत किरण गित्ते म्हणाले की प्राधिकरणावर सोपविण्यात आलेली जबाबदारी त्यांच्याकडून अद्याप पूर्ण झालेली नसल्याने सध्यातरी हे विलीनीकरण शक्य वाटत नाही महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या परिसरात होत असलेल्या अनियंत्रित व अनधिकृत बांधकामासंदर्भात बोलताना किरण गित्ते म्हणाले की ही बांधकामे रोखलीच पाहिजे त्याचबरोबर अनियंत्रित बांधकामाला नियंत्रणाखाली ओढत असताना त्यांना अपेक्षित असलेल्या सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात देखील विचार केला गेला पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button