breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी भाजी मंडईत पाणी साचल्याने दुर्गंधी

पिंपरी –  येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत पावसाचे पाणी साचल्याने दुर्गंधी पसरली असून, मंडईत आवश्‍यक सोयी-सुविधांची वानवा आहे. येत्या काही दिवसांत या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आंदोलन करू, असा इशारा शिवशाही व्यापारी संघाने दिला आहे.

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले, पिंपरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पिंपरी मंडईची परिस्थिती गंभीर असून तेथे तत्काळ योग्य सोयी-सुविधा न दिल्यास परिस्थिती आणखी दयनीय होईल. तेथील गाळेधारक नियमितपणे कर भरतात. तरी सोयीकडे दुर्लक्ष केले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button