breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पार्थ पवार यांच्यासह सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या पोलीस आयुक्तांच्या भेटीला

पिंपरी, (महाईन्यूज) – जनतेचे प्रश्न सोडविणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा कट रचणा-या प्रवृत्तींच्या निषेधार्त शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला आहे. शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांचे शिष्टमंडळ उद्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या भेटीला जाणार आहे. साने यांचे संपर्क कार्यालय फोडल्याच्या घटनेच्या तपासाला उशीर का होत आहे, अशी विचारणा उद्या करण्यात येणार आहे.

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे चिखलीतील संपर्क कार्यालय सात तरुणांच्या टोळक्याने चार दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या फोडले. हातात धारदार शस्त्रस्त्रे घेऊन साने चौकात हाहाकार माजवणा-या गुन्हेगारांना केवळ कार्यालयावर हल्ला करायचा नव्हता. तर, नेते साने यांच्यावरच प्राणघातक हल्ला करण्याच्या इराद्याने ते आले होते. मात्र, साने त्यावेळी बाहेर गेले होते. त्यामुळे गुन्हेगारांचा हा डाव फसला. आज साने यांच्याविरोधात कट रचला जात आहे. उद्या ही वेळ कोणावरही येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करत सत्ताधारी पक्षासह शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी असे सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या घटनेचा निषेध केला आहे. यासंदर्भात शिघ्र पाऊले उचलण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची भेट घेणार आहे, अशी माहिती दत्ता साने यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button