breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पार्थ पवारांच्या पिंपरी-चिंचवडमध्ये गाठी-भेटी; पण नागरिकांच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय आंदोलनास गैरहजेरी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – आगामी मावळ लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याची राष्ट्रवादी काँग्रेसचा संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा सुरु असतानाच आज (मंगळवार) पार्थ पवार यांनी दुस-या दिवशीही पिंपरी-चिंचवडमध्ये भेटीगाठी घेत आढावा घेतला. परंतू, काल शहरवासियांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आंदोलन झाले. त्या आंदोलनास शहरात असूनही गैरहजेरी दाखविल्याने नागरिकामधून नाराजी व्यक्त होत आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार पार्थ पवार यांनी भेटी-गाठी सुरू केल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आज ( मंगळवारी) सकाळी साडेनऊ वाजता त्यांनी मोरया गोसावी गणपतीची आरती केली. त्यानंतर शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती, तरुण, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना भेटून आढावा घेतला. त्यांनी काही कार्यकर्त्यांसह पिंपरीत चहाचाही आस्वाद घेतला. लोकसभेसाठी अद्याप आघाडीची घोषणा झाली नसून, मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. याठिकाणी शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे खासदार असून, त्यांना लढत देण्यासाठी पवार कुटुंबातील सदस्य उतरणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

दरम्यान, पार्थ पवार हे दोन दिवसापासून पिंपरी-चिंचवड शहरात गाठी-भेटी घेत आहेत. मात्र, शहरातील नागरिकांना शास्तीकर, रिंगरोड, अनधिकृत बांधकामे, रेडझोन आदी प्रश्न  भेडसावत आहेत. त्याच प्रश्नांववरुन काल (सोमवारी) सर्वपक्षीय आंदोलन महानगरपालिकेसमोर घेण्यात आले. ते शहरात असूनही त्यानी आंदोलनास भेट दिली नाही. त्यामुळे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहराचा दाैरा करीत असून त्यांना पिंपरी-चिंचवडकरांच्या प्रश्नाचे देणं-घेणं नसल्याचे यावरुन दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button