breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पार्थ पवारांसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता येईना, मावळातील मतदारात वाढली ‘क्रेझ’

  • पार्थ पवारांसोबत बालगोपाळाचा विजयोत्सव
  • विरोधकांवर टीका-टिप्पणी न करता मावळ विकास मांडताहेत जनतेसमोर अजेंठा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – एकीकडे मावळ लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी व विरोधकांच्या सभामधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होवू लागले आहेत. त्यात पार्थ पवारांना देखील सत्ताधारी लक्ष करत आहेत. अनेकदा नेटक-यांनी त्यांना ट्रोल केले. तरीही मावळ लोकसभेच्या मतदारांमध्ये पार्थ पवार यांची वेगळी ओळख निर्माण होवू लागली आहेत. विरोधकांवर अधिक टीका-टिप्पणी न करता, सतत स्वताः काय करणार याविषयी ते विकासाचा अजेंठा जनतेसमोर मांडू लागले आहेत. त्यामुळे जनसामन्यांत त्याची चांगली प्रतिमा निर्माण होत आहे.

तसेच प्रचारादरम्यान पार्थ पवारांसोबत सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरता येईना झाला आहे. महिला-मुलींसह बालगोपाळ देखील पार्थ पवारांसोबत सेल्फी आणि फोटो घेण्यास उस्सुक असल्याचे दिसत आहेत. तसेच बालगोपाळांनी पार्थ पवारांसोबत फोटो काढून विजयोत्सव साजरा केला आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वाे शरद पवाराचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपूत्र पार्थ पवार यांची मावळ लोकसभेसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर ते अधिक चर्चेत आले.  पार्थ पवार हे आपल्या पहिल्या भाषणात ट्रोल झाल्यानंतर त्यांनी मतदारांशी भेटीगाठीवर भर दिला होता. त्यानंतर कधी ट्रेनने प्रवास, कधी रिक्षाने करीत सर्वसामन्या नागरिकांशी थेट चर्चा करुन अडीअडचणी जाणून घेवू लागले, प्रचारात उत्साह आणण्यासाठी कधी घोड्यावर सवारी, आणि वाहतूक कोंडीचा फटका बसल्यावर रस्त्यावर धावाधाव, धार्मिक कार्यक्रमात भजन म्हणून मिसलेला सूर, पंगतीला जेवण वाढण्यासारख्या गोष्टी करुन पार्थने मावळातील मतदारांचे लक्ष स्वताःवर केंद्रीत केले आहे. सतत ट्रोल झालेल्य़ा पार्थ पवारांनी प्रचारात जोर पकडला असून त्यांची उरण, पनवेल, कर्जत परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.

हे उमेदवारी जाहीर झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेटक-यांमध्ये ट्रोल होत आहेत. सेंट्रल पार्कमध्ये मॉर्निंगवॉकला आलेल्या नागरिकांना आपली ओळख पटवून देत मतदानाचे देखील आवाहन करीत आहेत.

दरम्यान, चाैथ्या टप्प्यात मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचाराला चांगलीच रंगत येवू लागली आहे. राज्यातील पहिल्या, दुस-या आणि तिस-या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता चाैथ्या टप्प्यातील 17 जागेसाठी सत्ताधारी-विरोधी पक्षातील अनेक स्टार प्रचारकाच्या सभा होणार आहेत. त्यामुळे मावळात देखील जाहीर सभेत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. प्रचाराला अवघ्ये सहा दिवस राहिल्याने सर्वाचे लक्ष आता मावळ आणि शिरुर लोकसभेवर असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button