breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पाणी टंचाई विरोधात दापोडीत हंडा मोर्चा; राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील कृत्रीम पाणी टंचाईच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी या ठिकाणी हंडा मोर्चा काढून आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांसह सुमारे 30 जणांविरूध्द भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शहरात गेल्या कित्येक महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. दापोडीतील नागरिकांना या टंचाईचा मनस्ताप होऊ लागल्याने त्यांनी नगरसेवकांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यावर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे दापोडीतील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरसेवकांनी अनेकवेळा पत्रव्यवहार केला. मात्र, या विभागातील अधिका-यांनी पाणी पुरवठा सुरळीत केला नाही. म्हणून पालिका प्रशासनाच्या विरोधात नगरसेवक रोहीत काटे, राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटे यांनी येथील नागरिकांना सोबत घेऊन पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथे हंडा मोर्चा काढून आंदोलन केले.

दरम्यान, महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाल्याने नगरसेवक रोहीत काटे, राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटे यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास 30 नागरिकांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button