breaking-newsक्रिडा

पाकिस्तानच्या यासीर शाहची गाडी सुस्साट! कसोटी क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद

पाकिस्तानचा फिरकीपटू यासीर शाहने कसोटी क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 बळी घेण्याचा विक्रम यासीरच्या नावावर जमा झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात अबुधाबीमध्ये खेळत असताना यासीरने ही कामगिरी केली आहे. न्यूझीलंडच्या विल्यम सोमरवील हा यासीरचा 200 वा बळी ठरला आहे.

1936 साली ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी ग्रिमेट यांनी आपल्या 36 व्या सामन्यात 200 वा बळी घेतला होता. यासीर शाहने आपल्या 33 व्या सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली आहे. आपल्या या कामगिरीमुळे यासीर सध्या कसोटी क्रिकेटमधला सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक म्हणून गणला जातो आहे. यासीर शाह व्यतिरीक्त रविचंद्रन आश्विनने 37, डेनिल लिलीने 38 आणि वकार युनूसने 38 आणि डेल स्टेनने 39 व्या सामन्यांमध्ये 200 बळींचा टप्पा पूर्ण केला होता. त्यामुळे आगामी काळात यासीरचा हा विक्रम मोडला जाण्याची शक्यता कमीच आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button