breaking-newsक्रिडाराष्ट्रिय

पाकिस्तानचा संघ भारतात येणार?, BCCI ने मागितली केंद्राकडे परवानगी

भारत – पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यासाठी परवानगी मागितली आहे. महिला विश्वचषकात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने हे सामने महत्त्वाचे असल्याने बीसीसीआयने २९ मे रोजी केंद्र सरकारला पत्र पाठवून या दौऱ्यासाठी परवानगी मागितली आहे.

भारतीय सैन्याने बालाकोटमध्ये हवाई हल्ला केल्यानंतर भारत – पाकिस्तान संबंधांमधील तणावात भर पडली आहे. गेल्या सहा वर्षांपासून भारत – पाक यांच्यात क्रिकेट मालिका रंगलेली नाही. मात्र, महिला विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयसमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे. बीसीसीआयचे महाव्यवस्थापक (क्रिकेट ऑपरेशन्स) साबा करीम यांनी २९ मे रोजी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी बीसीसीआयची भूमिकाही स्पष्ट केली आहे.

“आयसीसीतर्फे वुमन्स चॅम्पियनशिपचे आयोजन केले जाते. यात संघांना एकमेकांविरुद्ध देशात आणि देशाबाहेरील मैदानांवर खेळावे लागते. या स्पर्धेतील गुण विश्वचषकातील पात्रतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात”, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

संभाव्य वेळापत्रकानुसार जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत पाकसोबत तीन सामने खेळावे लागणार आहे. आयसीसीला या दौऱ्यासाठी संमती देण्यापूर्वी बीसीसीआयने केंद्र सरकारला पत्र पाठवून या दौऱ्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली आहे. तर क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दौऱ्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

गेल्या वर्षी बीसीसीआयने आशिया कपचे आयोजनही संयुक्त अरब अमिरातमध्य केले होते. आशिया कपमध्ये पाकचा सहभाग असतो आणि त्यावेळी पाक संघाला भारतात खेळण्याची परवानगी देणे उचित ठरले नसते, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले. आता पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाच्या दौऱ्यास परवानगी मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. महिला विश्वचषक २०२१ मध्ये न्यूझीलंडमध्ये होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button