breaking-newsराष्ट्रिय

‘न्या. जोसेफ यांचे नाव पुन्हा मंजुरीसाठी पाठवा ‘

  • न्या.  चेलमेश्‍वर यांची सरन्यायाधिशांकडे मागणी

 
नवी दिल्ली – उत्तराखंडचे मुख्य न्यायाधिश के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करावी अशी शिफारस कॉलेजियमने केंद्र सरकारकडे केली होती, पण केंद्र सरकारने त्यांचे नाव कॉलेजियमकडे परत पाठवून दिले आहे. पण सरन्यायाधिशांनी कॉलेजियमची पुन्हा बैठक बोलावून न्या. जोसेफ यांचे नाव पुन्हा सरकारकडे शिफारस करून पाठवावे अशी मागणी न्या. चेलमेश्‍वर यांनी सरन्यायाधिशांना पत्र पाठवून केली आहे.

कॉलेजियमने केलेली शिफारस केंद्र सरकारने परत पाठवली आणि तरी कॉलेजियमने तेच नाव पुन्हा केंद्र सरकारकडे पाठवले तर त्याला अनुमती देणे केंद्र सरकारवर बंधनकारक आहे. त्यामुळे न्या जोसेफ यांच्या नावाची पुन्हा शिफारस करणे आवश्‍यक आहे असे न्या चेलमेश्‍वर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. न्या चेलमेश्‍वर हे येत्या 22 जूनला निवृत्त होत आहेत. ते स्वता कॉलेजियमचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी सरन्यायधिशांकडे केलेल्या मागणीला महत्व आहे. आता त्यावर सरन्यायाधिश काय भूमिका घेतात या विषयी उत्त्सुकता निर्माण झाली आहे. सेवाज्येष्ठतेनुसार न्या जोसेफ हे सर्वोच्च न्यायालयातील नियुक्तीसाठी पात्र आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button