breaking-newsआंतरराष्टीय

निदर्शने रोखण्यासाठी यासिन मलिक पोलिसांच्या ताब्यात

मलेशिया – मोबाईल फोन फुटल्याच्या अनेक घटना तुमच्या कानावर आल्या असतील आणि त्यात काहींना जीवघेणी दुखापत तर काहींचा मृत्यू झाल्याचे तुम्ही ऐकले असेल. मलेशियातही अशीच एक घटना समोर आली आहे. यात चॉर्जिंग सुरू असताना मोबाईलचा स्फोट होऊन चक्क एका कंपनीच्या सीईओचा मृत्यू झाला आहे. नाजरीन हसन असे मृत्यू झालेल्या सीईओचे नाव आहे.

नाजरीन हसन मलेशियातील क्रॅडल फंड या कंपनीत सीईओ पदावर कार्यरत होते. हसन यांच्याकडे ब्लॅकबेरी आणि हुवाई अशा दोन मोबाईल कंपनीचे स्मार्ट फोन होते. मोबाईलचा स्फोट झाल्यानंतर घरातील गाद्यांनी आणि कापडी वस्तूंनी पेट घेतला. त्यामुळे कोणत्या मोबाईलचा स्फोट झाला हे अद्याप कळू शकलेले नाही.

नाजरीन हसन यांचा मृत्यू आगीमुळे झाला नाही, तर स्फोटामुळे मोबाईलचे बारीक तुकडे त्यांच्या डोक्‍यात आणि शरीराच्या इतर भागात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. स्फोटानंतर हसन यांच्या खोलीला आग लागली. मात्र आगीमुळे त्यांचा मृत्यू झाला नाही, असे नातेवाईकाचे म्हणणे आहे.

या घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते हसन यांच्या मृत्यूचे कारण वेगळे आहे. पोलिसांच्या मते मोबाईलचा स्फोट झाल्यानंतर आगीमुळे झालेल्या धुरामुळे श्वास कोंडल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र हसन यांच्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल फोनच्या स्फोटानंतर झालेल्या दुखापतीत हसन यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button