breaking-newsआंतरराष्टीय

देशाच्या निर्यातीत २.१५ टक्क्यांची घसरण, व्यापारी तूट ही ५ महिन्याच्या नीचांकावर

देशातील निर्यातीत सप्टेंबरमध्ये २.१५ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. तर व्यापारी तूटही मागील ५ महिन्यातील नीचांकी स्तरावर आली आहे. यामागे कच्च्या तेलाच्या वाढत्या दराची भूमिका महत्वाची असल्याचे म्हटले जाते. उद्योग मंत्रालयाकडून सोमवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण हे निर्यात घसरणीचे मुख्य कारण आहे. वर्ष २०१७ च्या सप्टेंबरमध्ये डॉलरमध्ये सुमारे २६ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली होती. जीएसटी लागू झाल्यामुळे आधीच्या किमतीमध्ये मोठी कपात करण्यात आली होती. त्यामुळे निर्यातीत मोठी तेजी दिसून आली होती.

मंत्रालयाने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, निर्यातीत पुन्हा तेजी येईल. यावर्षीच्या ऑक्टोबरच्या आकडेवारीबाबत नंतर समजेल. आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये पेट्रोलियम उत्पादने, ऑर्गेनिक, इनऑर्गेनिक केमिकल्स, औषधे आदींच्या निर्यातीत सर्वाधिक तेजी राहिली. तर दुसरीकडे सप्टेंबरमध्ये आयातीत १०.४५ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली. सप्टेंबरमध्ये व्यापारी नुकसान १३.९८ अब्ज रुपये झाले. जे मागील पाच महिन्यातील सर्वाधिक खालच्या स्तरावर आहे.

इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडियाने (इइपीसी) म्हटले की, डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने निर्यातदारांना काही फायदा झाला नाही. सप्टेंबरच्या आकडेवारीतही ही घसरण दिसून आली. इइपीसीचे अध्यक्ष रवी सहगल म्हणाले की, सप्टेंबरमध्ये निर्यातीत २.१५ टक्क्यांची घसरण दिसून येते. घसरलेल्या रुपयाचा कोणताही फायदा झाला नसल्याचे त्यांनी म्हटले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button