breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

तरुण पर्यटकाच्या मृत्यूने जम्मू-काश्‍मीर पर्यटन व्यवसायाला हादरा!

श्रीनगर – अगोदरच डबघाईला आलेला जम्मू-काश्‍मीर पर्यटन व्यवसाय काश्‍मीरमध्ये दगडफेकीत जखमी झालेल्या एका तरुण पर्यटकाच्या झालेल्या मृत्यूमुळे बंद पडण्याची शक्‍यता असल्याचे टाक (ट्रॅव्हल एजंट्‌स असोसिएशन काश्‍मीर) चे अध्यक्ष आशफाक सिद्दिकी यांनी संगितले आहे.

काश्‍मीरमध्ये आलेल्या चेन्नईच्या तरुण पर्यटकाचा दग़डफेकीत झालेला मृत्यू हा जम्मू-काश्‍मीर पर्यटनाचा अंत करणारा शेवटचा घाव आहे असे त्यांनी म्हटले आहे. काश्‍मीरमधील दीर्घकाळच्या अशांतते मुळे गेली काही वर्षे येथील पर्यटन व्यवसाय डबघाईलाच आला होता. सन 2016च्या जलैमध्ये बुरहान वाणी या दहशतवाद्याचा सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चमकमकी मध्ये मृत्यू झाल्यानंतर. काश्‍मीर खोऱ्यातील शांती पूर्णपणे भंग पावली होती. दंगल आणि अशान्तता यांमुळे काश्‍मीरला येणाऱ्या पर्यटकाचंच्या संख्येत मोठीच घट झाली. सन 2016 पहिल्या चार महिन्यातील पर्यटकांची संख्या सन 2017 च्या तुलनेत 3,91,902 वरून 1,69,727 इतकी कमी झाली आहे.

या घटनेमुळे काश्‍मीर खोऱ्यातील पर्यटनावर बहिष्कार घालण्याचा प्रयत्नही एखादा घटक करू शकेल., असे सिद्दिकी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button