breaking-newsराष्ट्रिय

डोळ्यांदेखत प्रेयसीवर बलात्कार झाल्याने प्रियकराची आत्महत्या

प्रेयसीवर सामूहिक बलात्कार झाल्याने २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील कोबरा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. तरुणाच्या १७ वर्षीय प्रेयसीवर दोघांनी मिळून सामूहिक बलात्कार केला होता. सवन साई असं या तरुणाचं नाव होतं. आत्महत्येचा तपास करत असताना तरुणीने पोलिसांसमोर ही माहिती उघड केली.

बलात्कार आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी ईश्वर दास आणि खेम कनवर या दोघा आरोपींना अटक केली आहे. तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबरला आपण शाळेजवळ असताना संध्याकाळी दोघे आरोपी जबरदस्ती आम्हा दोघांना घेऊन गेले.

आरोपींनी आधी आम्हाला बेदम मारहाण केली. नंतर त्याच्यासमोरच माझ्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर त्यांनी आम्हाला सोडून दिलं अशी माहिती पीडित तरुणीने दिली आहे. दुसऱ्या दिवशी तरुणाला आरोपींनी गावातील काही लोकांना झालेल्या घटनेबद्दल सांगितलं असल्याची माहिती मिळाली होती. यामुळे त्याने आत्महत्या करत जीवन संपवलं. तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button