जांभळ्या लिपस्टीकमुळे उर्वशी रौतेला झाली ट्रोल
सिलीगुडीमधील एका इव्हेंटसाठी गेलेल्या उर्वशी भडक जांभळ्या रंगाची लिपस्टीक लावली होती. या “पर्पल लिप’सह तिने एक सेल्फी क्लीक केला आणि इन्स्टाग्रामवरच्या आपल्या अकाउंटवर पोस्ट केला. तिला वाटले होते, की तिचे फॅन या फोटोला लाईक करतील. तिची चर्चा होईल वगैरे वगैरे… पण झाले उलटेच भडक पर्पल लिपस्टीक लावलेल्या उर्वशीला फॅन्सकडून ट्रोल व्हायला सुरुवात झाली.
पब्लिकने तिची यथेच्च टिंगल केली. ती “भूत’ दिसत असल्यासारखे अनेक जण म्हणाले आहेत. या फोटोला लोकांनी लाईक केले नाही, असे नाही. दिवसभरामध्ये तब्बल 2 लाख 65 हजार जणांनी लाईक केले आहे. मात्र लाईकपेक्षा नकारात्मक टिप्पणीचे प्रमाण जरा जास्त असल्याचेच आढळून आले. लोकांनी तिला चक्क “घटिया’, “चुडैल’, “भूत’ अशी शेरेबाजी केली.
हा पर्पल रंग तुला अजिबात शोभून दिसत नाही. इतका वाईट रंग आहे की त्याचे वर्णन करायला शब्दच नाही, असेही काही फॅन्सनी तिला सुनावले. यापूर्वी “हेट स्टोरी 4’मध्ये उर्वशी दिसली होती. दुर्दैवाने या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अजिबात चांगला रिस्पॉन्स मिळाला नव्हता. अशी भडक लिपस्टीक लावायची सवय जर उर्वशीला असेल तर सिनेमाचे दुसरे काय होणार…!