breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जगतापांच्या आमदार निधीतून औंध जिल्हा रुग्णालयात एक कोटींचे साहित्य उपलब्ध

  • रुग्णांसाठी महागडे उपचार होणार स्वस्त
  • आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते साहित्याचे उद्घाटन

पिंपरी, (महाईन्यूज) – सांगवी येथील औंध ऊरो जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून १ कोटी १० लाखांची यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यात आले आहे. तसेच, महिलांसाठी स्वच्छतागृह, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी प्रतिक्षालय आणि रेकॉर्डरुमचीही उभारणी करण्यात आली आहे.

खरेदी केलेली यंत्रसामुग्री व साहित्य रुग्णालयाला उपलब्ध झाले आहे. त्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते गुरूवारी (दि. १८) उद्घाटन करण्यात आले. या यंत्रसामुग्रीमुळे रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर चांगले उपचार करणे शक्य होणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांनी औंध ऊरो रुग्णालयात कमी खर्चात होणाऱ्या उपचारसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.

सांगवी येथे सरकारचे औंध ऊरो जिल्हा रुग्णालय आहे. हे रुग्णालय चिंचवड विधानसभा मतदार संघांतर्गत येते. या रुग्णालयाचा पिंपरी-चिंचवडसोबतच पुणे शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना फायदा होतो. याठिकाणी गोरगरीब रुग्णांवर कमी दराने चांगले उपचार होतात. त्यामुळे याठिकाणी उपचारासाठी दर्जेदार आणि चांगली यंत्रसामुग्री व साहित्य असणे गरजेचे आहे. त्याचा विचार करून आमदार जगताप यांनी औंध ऊरो जिल्हा रुग्णालयासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २ डायलिसीस मशीन, डायलिसीस विभागासाठी एक हजार लिटर क्षमेतेचे १ आरओ प्लॅन्ट, ५ फंक्शन बेड आणि २ व्हेंटिलेटर मशीन खरेदी केले आहेत. त्याचप्रमाणे ५ प्रिंटर आणि स्कॅनर, औषध भांडाराची उभारणी, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी प्रतिक्षालयाची उभारणी, महिलांसाठी स्वच्छतागृहाची उभारणी तसेच रेकॉर्डरूमची उभारणी करण्यात आली आहे.

या सर्व यंत्रसामुग्री आणि साहित्यासाठी तसेच इतर कामांसाठी एकूण १ कोटी १० लाख रुपये खर्च आला आहे. यंत्रसामुग्री आणि साहित्य औंध ऊरो जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाले आहे. त्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते गुरूवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी पुणे आरोग्य विभागाचे उपसंचालक नितीन बिलोलीकर, जिल्हा शल्यचिकित्सक अशोक नांदापूरकर, रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

रुग्णांनी रुग्णालयातच उपचार घ्यावेत

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन शहराच्या हद्दीवरच सांगवी येथे सरकारचे जिल्हा रुग्णालय आहे. याठिकाणी रुग्णांवर कमी खर्चात चांगले उपचार केले जातात. हे रुग्णालय गोरगरीब रुग्णांसाठी वरदान आहे. रुग्णालय आणखी सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जेणेकरून या रुग्णालयांत दुर्धर आजारांवरही उपचार व्हावेत, हा हेतू आहे. तसेच, रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांचीही चांगली सोय करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता या रुग्णालयांत डायलिसीस विभाग सक्षम करण्याच्या उद्देशाने यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील गोरगरीब रुग्णांवर उपचारांसाठी औंध ऊरो जिल्हा रुग्णालयात उपलब्ध यंत्रसामुग्रीचा चांगला उपयोग करता येईल. रुग्णांनीही महागड्या रुग्णालयात जाऊन आपली आर्थिक लूट करून घेण्यापेक्षा औंध ऊरो जिल्हा रुग्णालयात उपचार करून घ्यावेत, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button