breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड विधानसभा मतदार संघात मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

पिंपरी – महापालिकेतील निवडणूक विभागाच्या वतीने छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. छायाचित्र मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार मदत केंद्रांवर फॉर्म नंबर 6, 7, 8 व 8 अ चे फॉर्म स्वीकारण्यात येत आहेत, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी दिलीप गावडे यांनी दिली आहे.

 

थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकूल (दुसरा मजला), चिंचवड येथील ब क्षेत्रीय कार्यालय, रहाटणी येथील ड क्षेत्रीय कार्यालय, त्याचबरोबर सर्व पात्र नागरिकांकडून सर्व संबंधित मतदान केंद्रावर शनिवारी (दि. 28) सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत चिंचवड विधानसभा मतदार संघतील मतदारांसाठी मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.

 

सर्व मतदारांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे मोबाईल क्रमांक द्यावयाचे आहेत. केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरोघरी भेट देऊन नमुना 6, 7, 8 व 8 अ चे फॉर्म स्वीकारणे, रंगीत फोटो गोळा करणे, स्थलांतरीत व मयत मतदारांच्या बाबत फॉर्म नं. 7 गोळा करणे, मतदार यादीतील दुरूस्तीसाठी फॉर्म 8 जमा करणे, अनिवासी भारतीय नागरिकांची माहिती संबंधित कुटुंबाकडून प्राप्त करणे, दुबार मतदारांना नोटीसा बजावणे, पंचनामा करणे आदी कामे सुरू आहेत, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी दिलीप गावडे यांनी दिली आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button