breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चा समाजाच्या कार्यकर्त्यांना स्थानबध्द

पिंपरी (महा ई न्यूज) –  मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेड आणि  सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चिंचवड येथील लोकमान्य रुग्णालयाजवळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांना स्थानबद्ध केले.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिंचवडमधील होणारी सभा उधळून लावणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी कार्यक्रम स्थळापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. चिंचवड स्टेशन येथून सकाळी दहा वाजता मोर्चा निघाला. महामार्ग ओलांडून मोर्चा लोकमान्य रूग्णालय जवळ आला असता पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

या आंदोलनात मराठा सेवा संघाचे सतीश काळे, नकुल भोईर, सुधीर उंडे, रसीद सय्यद,  मारुती भापकर, ज्ञानेश्वर लोघे, विनायक जगताप, प्रवीण बोऱ्हाडे, गणेश कोकाटे, वैभव जाधव, अभिषेक मते, अक्षय बुंदील, प्रकाश जाधव, भैय्यासाहेब गगणे, लहु लांडगे, प्रकाश जाधव,  अमोल मानकर, किरण जगदाळे, जीवन बोऱ्हाडे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून वाकडला घेवून गेले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button