breaking-newsपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये रविवारी ‘डॉग शो’चे आयोजन  

देश-विदेशातील विविध जातीचे श्वान पाहण्याची पर्वणी 
पिंपरी –  पुना केनल कॉन्फेडरेशन या संस्थेच्या वतीने रविवारी (दि. 21 ) ‘ऑल ब्रीड चॅम्पियनशिप डॉग शो’ चे आयोजन केले आहे, अशी माहिती एन. एस. पटवर्धन यांनी दिली.        
आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी चिंचवड येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत देश, विदेशातील वेगवेगळ्या जातीचे श्वान शहरवासियांना पाहण्याची पर्वणी ठरणार आहे. यामध्ये जर्मन शेफर्ड, डॉबरमन, ग्रेट डेन, बीगल, पग, क्रॉकर्स स्पॅनिएल, बुल मास्टिफ, लासा, रॉटविलर, डालमिशन तसेच विशेष आकर्षण म्हणुन अफगाण हाउंड, जायंट श्नाउजर, फॉक्स टेरियर, साइबेरियन हस्की या जातीचे श्वान स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
केनल क्लब ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने 112 व 113 वी चॅम्पियनशीप स्पर्धा होत आहे. यामध्ये मायनर पपी, पपी, ज्युनियर, इंटरमेडिएट, ब्रेड इन इंडिया, ओपन, चॅम्पियन या गटात स्पर्धा होतील. फिलिपाइन्स येथील साइमन सिम, स्विडन येथील नीना कार्ल्सडॉटर आणि भारतातून मुकुल वैद व संजय देसाई हे परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. देशभरातून तीनशेहून जास्त श्वानांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत होणा-या या स्पर्धेत सर्व प्रेक्षकांना मोफत प्रवेश आहे. देश, विदेशातील नामांकित जातीचे श्वान पाहण्याची संधी शहर वासियांना मिळणार आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक योगेश आकुलवार, सिद्धेश दर्शीले, तुकाराम सुर्वे, विकास बाराथे, संजय मुत्तुर, विक्रांत भोसले, राजेश जाधव यांनी केले आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button