breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खासदार बारणे, ‘पार्थ’ नावाच्या वादळात फडफडत विझणारा दिवा

  • विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची जहरी टिका
  • खासदार बारणे यांच्या टिकेला दिले प्रत्युत्तर

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत तीनवेळा नगरसेवक राहिलेले आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या कृपाशिर्वादाने स्थायी समितीच्या अध्यक्ष पदावर राहून मलिदा लाटणारे खासदार श्रीरंग बारणे यांनी युवानेते पार्थ पवार यांच्या फ्लेक्सची चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसते. मावळात पार्थ यांचे फ्लेक्स लावल्याने बारणेंची एवढी त्रेधातिरपीट उडाली आहे. प्रत्यक्षात पार्थ पवार लोकसभेच्या मैदानात उतरल्यानंतर बारणे औषधाला देखील उरणार नाहीत. वादळात विझण्यापूर्वी जसा दिवा फडफड करतो. तशी बारणेंची ही फडफड सुरू आहे, अशी जहरी टिका पालिकेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरूवारी (दि. 10) पत्रकार परिषदेत ‘कोण हा पार्थ पवार?’ ‘मी त्याला ओळखत नाही’. ‘असे कित्येक पवार आले तरी मला फरक पडत नाही’, अशा शब्दांत पार्थ पवार आणि अजित पवार यांच्यावर टिका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी बारणे यांचा आज शुक्रवारी (दि. 11) खरपूस समाचार घेतला आहे. साने म्हणाले, खासदार बारणे महापालिकेत तीनवेळा नगरसेवक राहिले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात अजित पवार यांच्या आशिर्वादानेच त्यांना स्थायीचे अध्यक्षपद मिळाले. या पदावर राहून त्यांनी मलिदा लाटला. शिवसेनेचा गटनेता असताना सुध्दा अजितदादा उपमुख्यमंत्री असताना बारणेंना सांभाळून घेतले. त्यांच्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात त्यांच्या प्रभागातील कामांना अजितदादांनी प्रथम प्राधान्य देऊन कामे मार्गी लावण्यास मदत केली. त्यावेळी बारणेंना अजितदादांची आणि शरद पवारांची ओळख पटली नाही का, असा सवाल साने यांनी उपस्थित केला.

साने म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांपासून नेते शरद पवार लोकसभेचे सदस्य म्हणून देशाच्या विकासकार्यात योगदान देत आले आहेत. आज पवारसाहेब संसदेत नसले तरी शिवसेनेच्या अन्य खासदारांकडून त्यांची काम करण्याची पध्दत बारणेंनी ऐकलीच असेल. हे त्यांना खुपत असेल म्हणून तर त्यांचा जळफळाच होताना दिसतो. मावळ मतदार संघात केवळ पार्थ यांचे फ्लेक्स झळकले म्हणून बारणेंची त्रेधातिरपीट उडाली आहे. प्रत्यक्षात पार्थ निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर बारणे औषधाला देखील उरणार नाहीत. वादळात विझण्यापूर्वी दिवा जसा फडफड करतो. तशी बारणेंची ही फडफड सुरू आहे. पार्थ पवार यांच्या नावाने उठलेल्या वादळात हा दिवा कधी विझून जाईल हे त्यांना देखील कळणार नाही, अशा शब्दांत साने यांनी बारणेंवर ठासून टिका केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button