breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खासदार, आमदारांवर शिव्यांची लाखोली; शिवसैनिकांचा आंदोलनात राडा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – सत्ताधारी भाजपच्या विरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर सुरू असलेल्या आंदोलनात छावा संघटनेच्या अध्यक्षांनी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली आहे. हा प्रकार पाहून आंदोलनात सहभागी शिवसैनिकांनी उग्र रूप धारण करून छावा संघटनेचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलनाचा फज्जा उडाला असून मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांना अक्षरषः दिलगिरी व्यक्त करावी लागली. तर, आंदोलनकर्त्या महिलांनी या दिलगिरीचा निषेध नोंदविला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे, शास्ती कर, संतपीठ अफरातफर प्रकरण, भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण आणि पीएमपीएमएल बस खरेदीच्या विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे आणि विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर आंदोलन सुरू झाले. मात्र, आंदोलनाचे नियंत्रण सुटल्याने आंदोलनकर्त्यांचे वेगवेगळे गट तयार झाले. त्यातच छावा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळेकर यांनी भाजप बरोबर सत्तेत असलेले शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली. त्यामुळे आंदोलनात सहभागी शिवसैनिक चांगलेच खवळून उठले. खासदारांचे नाव का घेतले, असा जाब छावा अध्यक्ष येळेकर यांना विचारला.

शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर आणि संपर्क प्रमुख युवराज दाखले यांनी खासदार बारणे यांचे नाव घेतल्याने राडा घातला. आंदोलन नागरिकांच्या प्रश्नांसाठी असून खासदारांचे नाव घेण्यास त्यांनी विरोध दर्षविला होता. तेवढ्यात घर बचाव संघर्ष समितीच्या महिलांनी खासदार बारणे आणि आमदार जगताप यांच्या विरोधात घोषणा दिल्या. आमची घरे पाडण्यात हेच खासदार, आमदार जबाबदार आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे नाव आंदोलनात घेणारच, असा पवित्रा घेतला. तेवढ्यात राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, गटनेते राहूल कलाटे, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मध्यस्ती करत संतप्त महिला कार्यकर्त्या आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना शांत होण्याचा इशारा केला. दरम्यान, दोन्ही गटांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button