breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

क्रांतीवीर चापेकरांच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी भूमीपूजन

  • भाजप पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती  

 

पिंपरी – चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या इमारतीचे भूमीपूजन सोमवारी (दि. 23) सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या संग्रहालयामुळे पिंपरी-चिंचवडच्या वैभवात भर पडणार आहे, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शनिवारी (दि. 21) पत्रकार परिषदेत दिली. या संग्रहालयापासून तरुणांना प्रेरणा मिळून ते देशातील समता आणि बंधुता टिकवून ठेवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, असा विश्वास क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केला.

 

या संग्रहालयात क्रांतीवीर चापेकरांनी वापरलेली इतिहासकालीन शस्त्रास्त्र, अवजारे, उपकरणे ठेवण्यात येणार आहेत. चापेकरांच्या ऐतिहासिक क्षणांची साक्ष देणारी दहा फुट उंचीची 40 शिल्प राहणार आहेत. तत्कालीन इंग्रजांच्या राजवटीचा इतिहास उलघडून सांगणारी पुरेसी माहिती उपलब्ध राहणार आहे. परकियांनी भारतावर आक्रमण केल्यानंतर संतांच्या कर्तृत्वाने सामाजिक ऐक्य टिकून राहिले, त्याची माहिती सांगणारा इतिहासही या संग्रहालयात पहायला मिळणार आहे. देशभरातील वेगवेगळ्या वस्तू संग्रहालयातील चापेकरांच्या कर्तृत्वाची साक्ष देणा-या वस्तुंचा संग्रह याठिकाणी केला जाणार आहे. त्यावेळच्या भारताचे उभेउभ चित्र मनामध्ये प्रकट होईल एवढी पुरेसी माहिती तरुणांना अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभुणे यांनी सांगितली.

 

यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक माउली थोरात, अॅड. मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, अमित गोरखे, स्थायी समिती सदस्य विलास मडिगेरी, प्रवक्ते अमोल थोरात, शैला मोळक आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button