breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोचिंग सेंटरमध्ये भीषण आग.. एका शिक्षकासह 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू (VIDEO)

सुरत – सुरत शहरात शुक्रवारी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. सरथाणा परिसरातील तक्षशीला कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर दुपारी भीषण आग लागली. आग लागल्यानंतर काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपला जीव वाचवण्यासाठी बिल्डिंगवरुन बाहेर उड्या घेतल्या. यात एका शिक्षकासह 19 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

https://youtu.be/FWInJnq1fL4

तक्षशीला कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर कोचिंग क्लास सुरु होता. याच मजल्यावर आग भडकली. यावेळी क्लासमध्ये 30 हून जास्त विद्यार्थी- विद्यार्थिंनी उपस्थित होते. आग सर्वत्र झपाट्याने पसरली. विद्यार्थ्यांना बाहेर निघण्यासाठी कोणताही मार्ग सापडला नाही. बहुतेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी थेट तिसऱ्या मजल्यावरुन खाली उ़ड्या घेतल्या. या दरम्यान, धूरामुळे काही विद्यार्थी बेशुद्ध झाले. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे.

तब्बल एक तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना आले आहे.  घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 18 गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्यात आली आहे.  तसेच इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button