breaking-newsक्रिडा

कोकणे स्टार्स, प्राधिकरण ब्लास्टर्स संघ बाद फेरीत

पुणे  – कोकणे स्टार्स आणि प्राधिकरण ब्लास्टर्स यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून सलग तिसऱ्या विजयासह “लायन्स्‌ प्रौढ लीग अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीतील आपला प्रवेश निश्‍चित केला.

नागेश चव्हाण याच्या खेळीच्या जोरावर कोकणे स्टार्स संघाने प्राधिकर ब्लास्टर्स संघाचा 6 गडी आणि केवळ 1 चेंडू शिल्लक ठेऊन पराभव केला. प्राधिकरण ब्लास्टर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 146 धावा जमविल्या. प्रत्युत्तरात खेळताना हे आव्हान कोकणे स्टार्स संघाने 19.5 षटकांत व 6 गडी गमावून पूर्ण केले.

तर, दुसऱ्या सामन्यात संतोष शहाच्या 45 धावांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर पासलकर रॉयल्स्‌ संघाने नवले ऑक्‍सीकेअर संघाचा 78 धावांनी पराभव केला. पासलकर रॉयल्स्‌ संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 18 षटकांत 5 गडी गमावून 173 धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाचा पाठलाग करताना नवले ऑक्‍सीकेअर संघाचा डाव 18 षटकांत 95 धावांवर मर्यादित राहीला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button