breaking-newsपुणेमहाराष्ट्र

कॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात औरंगाबाद, नांदेडमधून आणखी दोघेजण ताब्यात

सायबर गुन्हे शाखेची कारवाई

कॉसमॉस बँकेचा सव्‍‌र्हर हॅक करून ९४ कोटींची रोकड लूटप्रकरणात सायबर गुन्हे शाखेकडून आणखी दोघांना अटक क रण्यात आली. औरंगाबाद आणि नांदेड येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. के. खराडे यांनी दोघांना १८ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

शेख मोहम्मद अब्दुल जब्बार (वय २८, रा. मिर्झा कॉलनी, औरंगाबाद) आणि महेश साहेबराव राठोड (वय २२, रा. धावरीतांडा, नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात यापूर्वी फहिम मेहफुज शेख (वय २७, रा. नुरानी कॉम्प्लेक्स, भिवंडी) आणि फहिम अझीम खान (वय ३०, रा. आझादनगर, औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आणखी पाचजणांना अटक करण्यात आली आहे, तर आणखी पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या शोध घेण्यात येत आहे. मुंबई, इंदूर, कोल्हापूर येथील एटीएम केंद्रात मिळालेले सीसीटीव्ही चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेण्यात आले होते चित्रीक रणाद्वारे आरोपींचा माग काढण्यात येत होता. आरोपी शेख, राठोड आणि खान यांनी कोल्हापुरातून पैसे काढण्यासाठी ९५ बनावट डेबिट कार्डचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुंबई, इंदूर, कोल्हापूर या शहरांमधील एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेण्यात आले होते. तांत्रिक पडताळणीत आरोपी भिवंडी, औरंगाबाद, हैदराबाद, गोवा आणि विरारा भागात असल्याची माहिती मिळाली होती. याद्वारे तपास करण्यात आला आणि आरोपी शेख, खान आणि राठोड यांना ताब्यात घेण्यात आले. बनावट डेबिट कार्डचा वापर केला असून त्याद्वारे ८९  लाख ४७ हजार ५०० रुपये काढण्यात आले आहेत. ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान हे पैसे काढण्यात आले आहेत. सव्‍‌र्हरवर हल्ला करण्यापूर्वी आरोपींना बनावट डेबिट कार्ड देण्यात आले असावेत, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

खान, शेख, राठोड आणि त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी कोल्हापुरातील विविध बँकांच्या एटीएम केंद्रातून पैसे  काढले आहेत. त्यांनी कोल्हापूरची निवड का केली, या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. खान, शेख आणि साथीदारांना बनावट डेबिट कार्डचा वापर करून पैसे काढण्याची सूचना देण्यात आली होती. त्यासाठी त्यांना काही मोबदला देण्यात आला असावा. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे. बनावट डेबिट कार्ड तयार करण्यासाठी बँकेतील कोणी डाटा दिला का, याबाबतची माहिती घेण्यात येत आहे. एकंदरच हा गुन्हा नियोजनबद्ध रितीने करण्यात आला आहे.या दृष्टीने तपास करण्यात येत असून आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली.  दरम्यान, गुरुवारी अटक करण्यात आलेले आरोपी शेख आणि राठोड यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button