breaking-newsक्रिडा

कुलदीपने प्रसारमाध्यमांना झापले, धोनीबद्दलच्या व्यक्तव्यांचा विपर्यास

फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने प्रसारमाध्यमांवर त्याच्या विधानाचा विपर्यास केल्याचा आरोप केला आहे. त्याने एका इन्टाग्राम पोस्टच्या माध्यामातून आपली नाराजी दर्शवली आहे. CEAT पुरस्कार वितरण सोहळ्यात फिरकीपटू कुलदीप यादवला outstanding performance of the year पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यावेळी बोलताना त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्याबद्दल एक विधान केले होते. मात्र, या विधानाचा प्रसारमाध्यमांकडून चुकीचा अर्थ घेण्यात आला असे स्पष्टीकरण कुलदीप यादव याने दिले आहे.

आपल्या इन्टाग्राम पोस्टमध्ये कुलदीपने “प्रसारमाध्यमांनी केवळ मसालेदार बातम्या करण्यासाठी माझ्या विधानांचा चुकीचा अर्थ काढला. परंतु या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. चाहत्यांनी या बातम्यांकडे लक्ष देऊ नये. मी धोनी बाबत असे कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही.” असे म्हटले आहे.

याआधी CEAT पुरस्कार वितरण सोहळ्यात धोनीबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर व्यक्त होताना “सामन्यादरम्यान धोनीला जास्त बोलणं आवडत नाही, ज्यावेळी माही भाईला गरज वाटते त्यावेळी यष्टीमागून टीप्स देत असतो. यष्टीमागून धोनी अनेकदा गोलंदाजांना मार्गदर्शन करत असतो. षटक सुरू असताना मध्येच तो आम्हाला काही टिप्स देतो. काहीवेळा त्या कामी येतात, पण अनेकदा त्या अपयशीही ठरतात. धोनीच्या टिप्स चुकीच्या ठरल्या तरीही माही भाईला आम्ही काही बोलू शकत नाही.” असे म्हटले होते. या वक्तव्यांसाठी कुलदीपला नेटकऱ्यांकडून ट्रोल देखील करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button