breaking-newsआंतरराष्टीय

किम जोंग उन यांचा मोठा निर्णय,आण्विक परीक्षण स्थळ करणार बंद

प्योंगयांग (उत्तर कोरिया) –उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर कोरियाचे आण्विक परीक्षण स्थळ बंद करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. उत्तर कोरियाच्या मीडियाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियन सरकार आपले आण्विक परीक्षणस्थळे 23 मे ते 25 मे या कालावधीत बंद करणार आहे. किम जोंग इन यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येणार असून त्यासाठी उत्तर कोरियाच्य मीडियाबरोबरच चीन, रशिया, अमेरिका, ब्रिटन आणि दक्षिण कोरियाच्या पत्रकारांनाही यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

उत्तर कोरियाच्या आपले आण्विक परीक्षण स्थळे बंद करण्याच्या या निर्णयाचा किम जोंग उन आणि डोनॉल्ड ट्रम्प यांच्या भेटीशी जोडण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांच्या या निर्णयाचे स्वागत केले केले आहे. किम जोंग उन यांचा हा निर्णय म्हणजे एक अतिशय “स्मार्ट मूव्ह’ आहे असे त्यांनी म्हटले आहे. आणि त्यासाठी किम जोंग उन यांचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटमध्ये डोनॉल्ड ट्रम्प म्हणातात, “12 जून रोजी होणाऱ्या शिखर परिषदेपूर्वी उत्तर कोरियाने केलेली आण्विक स्थळ बंद करण्याची घोषणा म्हणजे अत्यंत स्मार्ट मूव्ह आहे, आणि असे उदार संकेत दिल्याबद्दल त्यासाठी किम जोंग उन यांना धन्यवाद दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button