breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटक निवडणूकीवर ट्विट केल्याने उदय अडचणीत

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि कॉंग्रेसमध्ये संघर्ष सुरू आहे. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपचा झेंडा अखेर कर्नाटकात फडकला असून भाजपच्या येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, कर्नाटकची ही निवडणुक एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशीच होती. सर्व स्तरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. बॉलिवूड अभिनेता उदय चोपडाने यातसंदर्भात असे काही ट्‌विट केले की ज्याचे परिणाम त्याला भोगावे लागले.

आपल्या ट्‌विटमध्ये उदयने लिहिले आहे की, कर्नाटकच्या राज्यपालांबद्दल मी गुगलवर शोधले. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ते संलग्न आहे. मला असे वाटते की आता आपले काय होणार? हे आता सगळ्यांनाच माहित आहे. पण नेटकऱ्यांना उदय चोपडाचे हे ट्‌विट काही आवडले नाही. त्यामुळे त्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. त्याच्या चाहत्यांनी त्याला बॉलिवूडचा राहुल गांधी असे ट्‌विट करत सोशल मीडियावर ट्रोल केले.

उदय चोपडाच्या या ट्‌विटवर ऐवढ्या टिका झाल्यानंतर त्याने आणखी एक ट्‌विट लिहिले आणि त्यात तो म्हणाला की, माझ्या ट्‌विटवर एवढे ट्रोल केले गेले. पण मी एक भारतीय नागरिक असून देशाची मला काळजी आहे. पण तुमच्या विचारांना डावलण्याची माझी हिंमत नसल्याचेही त्याने बजावले.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button