breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

कर्जत तालुक्यात महायुतीच्या प्रचाराचा झंझावात; घटक पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसली

कर्जत । शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील ग्रामीण भाग पिंजून काढला. गावोगावी भेटी देऊन मागील पाच वर्षात केलेल्या कामांचा आढावा त्यांनी उपस्थित जनतेसमोर मांडला. यावेळी सर्व स्तरातील नागरिकांनी त्यांना विजयी होण्याचा विश्वास दिला.
यावेळी माजी आमदार देवेंद्र साटम, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, महिला जिल्हाप्रमुख रेखा ठाकरे, नगरसेविका यमुताई विचारे, संपर्कप्रमुख दत्ता दळवी, तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, जिल्हाचिटणीस रमेश मुंडे, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, किसान मोर्चाचे सुनील कोकटे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे, विधानसभा संघटक संतोष भोईर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, माजी उपसभापती मनोहर थोरवे, संघटक राजेश जाधव, रमेश सुर्वे, वसंत भोईर, संतोष भोईर, भाजप सरचिटणीस राजाराम शेळके, माजी उपतालुका प्रमुख विष्णू झांजे, ज्ञानेश्वर भालीव्डे, दिलीप ताम्हाणे, विनायक पवार, संतोष घाडगे, निलेश पिंपरकर, विजय चवरे, महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रुपग्रामपंचायतच्या नांगुर्ले गावातून प्रचार दौ-यास सुरुवात झाली. मोहिली, तमनाथ, मोहोली, नेवाळी, आवळस, बीड बुद्रुक, चोची, कोंदिवडे, खांडपे, पोसरी, कशेळे, खांडस, वारे आदि गावांमध्ये जाऊन नागरिकांशी चर्चा केली. महिलांनी बारणे यांचे औक्षण करून स्वागत केले. तसेच ‘महायुतीचा विजय असो’, ‘फिर एक बार मोदी सरकार’ च्या जयघोषात बारणे यांचे स्वागत करून येत्या लोकसभा निवडणुकीत विजयी होण्याचा विश्वास दिला. कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात बारणे यांनी केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचाविण्यासाठी घटक पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button