breaking-newsताज्या घडामोडीपुणे

एका बुक्कीत दात पाडेन, काॅंग्रेस आमदारांची पोलिसाला दंडेलशाही

पंढरपूर – येथील विठ्ठल मंदीर परिसरात अतिक्रमण काढण्यावरून काँग्रेसचे आमदार भारत भालके आणि पोलिसांमध्ये चांगलाच वाद झाला. यावेळी आमदार भारत भालकेंनी पोलिस निरीक्षक विश्वास साळुंके यांचेशी अरेरावी करत एकाच बुक्कीत दात पाडेन, अशी थेट धमकीच दिली.

पोलिसांनी येथे अतिक्रमणविरोधी कारवाई सुरु केलेली कारवाई थांबविण्याची मागणी करत आमदार भारत भालकेंनी पोलिस अधिका-यांशी हुज्जत घातली. अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंदीर परिसरात पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. सुरक्षेचा भाग म्हणून पोलिसांनी मंदीर परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली असताना खुद्द आमदारांनीच पोलिसांच्या या कारवाईला विरोध करत पोलिस अधिका-यांशी हुज्जत घातली. याप्रकरणी आमदार भालके यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button