breaking-newsपुणे

उदयनराजे राष्ट्रवादीचे ‘स्टार प्रचारक’, पवारांच्या दिल्लीतील भेटीनंतर चर्चा तर होणारच

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत खासदार उदयनराजे भोसले यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. नुकतेच, उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे. तसेच प्रफुल्ल पवारांशीही आगामी निवडणुकांबाबत चर्चा केली.

राज्यात उदयनराजेंना युवक वर्गाचा मिळणारा वाढता प्रतिसाद आणि त्यांची लोकप्रियता लक्षात घेता, त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी सुत्रांची माहिती आहे. दरम्यान, साताऱ्यातून उदयनराजेंना विरोध असल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार का नाही, याबाबत चर्चा होती. मात्र, पवार-भोसले भेटीनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचं चर्चिलं जात आहे. तर, साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित मानण्यात येत आहे.

https://twitter.com/Chh_Udayanraje/status/1093554484037537793

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button