breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आम्हाला पार्थ पवार हेच मावळचे उमेदवार म्हणून चालतील, अन्यथा…  

  • मावळातील पार्थ पवार यांची यंग ब्रिगेड मैदानात
  • बैठकीत ठराव मांडून एकमुखाने दिली संम्मती

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या मावळ उमेदवारीला हिरवा कंदील दाखविला नसला, तरी मावळातील राष्ट्रवादीच्या कट्टर कार्यकर्त्यांनी आम्हाला पार्थ पवार हेच उमेदवार हवे आहेत, असा एकमुखी नारा दिला आहे. याबाबतचा ठराव तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी सर्वानुमते सम्मत केला आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून पार्थ पवार यांच्या नावाची पुन्हा चर्चा जोर धरू लागली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून पार्थ पवार यांनी मावळ लोकसभेचा दौरा सुरू केला होता. त्यांच्या चाहत्यांनी जोरदार प्रचाराची धुरा हाती घेतली होती. त्यातच पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना पवार कुटुंबियातून केवळ मीच लोकसभा निवडणूक लढविणार आहे, असे विधान केले होते. त्यामुळे मावळातील पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पार्थ पवार यांच्या यंग ब्रिगेडमध्ये यामुळे कमालीची नाराजी देखील पसरली होती.

  • शरद पवार यांनी जरी असे निकारात्मक विधान केले असले तरी मावळातील राष्ट्रवादीच्या कट्टर समर्थकांनी आम्हाला पार्थ पवार हेच मावळातून राष्ट्रवादीचे उमेदवार हवे आहेत, अन्यथा आम्ही दुस-या उमेदवाराचे काम करणार नाही. असा पवित्रा घेतला आहे. त्याबाबत बैठकीत ठराव मांडून कार्यकर्त्यांनी त्याला हात वर करून मंजुरी दिली आहे. हा ठराव पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

महाराष्ट्र ओबीसीसेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबोधे, मावळ निरीक्षक विजयराव कोलते, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, अर्चना घारे, हेमलता काळोखे, किशोर भेगडे, संतोष भेगडे, सचिन घोटकुले, संतोष मु-हे, राजश्री राऊत, सुनिल दाभाडे, बाबुराव वायकर, सुनिल भोंगाडे, कैलास गायकवाड, जिवन गायकवाड, अशोक घारे, दिपक मानकर, अंकुश आंबेकर, नारायण ठाकर, नवनाथ चोपडे, अशिष खांडगे, संजय शेडगे, अतुल राऊत आदी सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button