breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला 15 वर्ष करावासाची शिक्षा

अल्पवयीन मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला 15 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष पॉस्को न्यायालयाने तरुणाला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. आरोपीने गुन्हा करण्यापूर्वी दोन वर्ष आधी पीडित तरुणीशी मैत्री केली होती. मुलगी गरोदर असल्याचं तिच्या आईला कळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

न्यायालसमोर साक्ष देणाऱ्यांमध्ये पीडित तरुणीचाही सहभाग होता अशी माहिती विशेष सरकारी वकील विनोद मोरे यांनी दिली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीशी आपली मैत्री झाली होती. एक मित्र म्हणूनच आपण त्याला आपल्या घरी बोलावलं होतं. पण आरोपीने आपल्याला मारहाण केली आणि बलात्कार केला. आरोपीने यानंतर अनेकदा धमकावत आपल्यावर बलात्कार केल्याचंही पीडित तरुणीने सांगितलं.

आपण जेव्हा गर्भवती झालो तेव्हा आरोपीने पुन्हा एकदा आपल्यावर अत्याचार केले आणि डॉक्टरकडे जाण्याची जबरदस्ती केली. पण आपण त्यासाठी नकार दिल्याचं पीडित तरुणीने सांगितलं. यानंतर आरोपी निघून गेला आणि कोणत्याही प्रकारे पीडित तरुणीशी संपर्क ठेवला नाही.

आई डॉक्टरकडे घेऊन गेली असता आपण गरोदर असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर मी तिला आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला असं तरुणीने सांगितलं आहे. घडलेला प्रकार कळल्यानंतर मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button