breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची CNN च्या पत्रकारासोबत हुज्जत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आणि CNN चा पत्रकार यांचा वाद झाला. या वादानंतर पत्रकाराचे ओळखपत्र काढून घेण्यात आले. जिम अकोस्टा असे या पत्रकाराचे नाव आहे. त्याने डोनाल्ड ट्रम्प यांना विस्थापितांबाबतचा प्रश्न विचारला. त्यावेळी ट्रम्प यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी या पत्रकाराला बसायला सांगितले. एवढेच नाही तर तू तुझा माईक बंद कर, तुझ्यासारखा माणूस जेव्हा सीएनएन सारख्या चॅनलमध्ये काम करतो ही त्या कंपनीला लाज बाळगण्यासारखी गोष्ट आहे. तुला कुठे काय बोलावं ते कळत नाही तू एक उद्धट माणूस आहेस असं म्हणत या पत्रकाराचा ट्रम्प यांनी पाणउतारा केला.

Reuters Top News

@Reuters

President Trump snarled at CNN reporter Jim Acosta, telling the journalist ‘that’s enough, put down the mic,’ and calling him ‘the enemy of the people.’

मध्यवर्ती निवडणुकांच्या वेळी तुम्ही विस्थापितांचा प्रश्न का पुढे आणला? असा प्रश्न या पत्रकाराने विचारला ज्यानंतर ट्रम्प यांचा पारा चढला आणि त्यांनी या पत्रकाराला खडे बोल सुनावले आहे. त्यानंतरही या पत्रकाराने आपली जिद्द कायम ठेवत डोनाल्ड ट्रम्प यांना दुसरा प्रश्न विचारला. २०१६ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जेव्हा पार पडली तेव्हा त्या निवडणुकीत रशियाचा सहभाग होता असा आरोप होतो आहे त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे ? असे या पत्रकाराने विचारले. ज्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणखी चिडले. या पत्रकाराचे ओळखपत्रही काढून घेण्यात आले आणि त्याच्यावर ट्रम्प खेकसलेच.

तुला लोकप्रतिनिधींशी आणि लोकांशी कसे वागावे ते समजत नाही. तुझ्यासारखा माणूस सीएनएन मध्ये कसा काय काम करू शकतो? तुझ्यासारख्या माणसाला आणि तुझ्या चॅनलला फक्त फेक न्यूज चालवायच्या असतात ज्याने तुम्हाला टीआरपी मिळतो पण तुम्ही देश चालवू शकत नाही ते माझे काम आहे असेही ट्रम्प यांनी या पत्रकाराला सुनावले.

CNN या वृत्तवाहिनीने या सगळ्या वादानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा पत्रकार आणि पत्रकारितेकडे पाहण्याचा दृष्टीकोनच चुकीचा आहे. ट्रम्प फक्त धोकादायक नाहीत तर अस्वस्थ करणारे अमेरिकन आहेत. पत्रकारितेचे स्वातंत्र्य मान्य नाही हे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे आणि ते अगदी तसेच वागत आहेत. आम्ही आमचा पत्रकार जिम अकॉस्टा याच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत त्याने कोणताही उद्धटपणा केलेला नाही असे ट्विट CNN ने केले आहे.

दरम्यान जिम अकॉस्टा आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा वाद सुरु असताना दुसऱ्या एका पत्रकाराने त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या पत्रकारालाही गप्प बसवले. पत्रकार परिषदेतून व्हाईट हाऊसच्या प्रशिक्षणार्थी महिलेने अकॉस्टा यांचा माईक हिसकावला आणि त्यांचे ओळखपत्रही काढून घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button