breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अभ्यास दाै-याच्या नावाखाली महिला पदाधिकारी जाणार ‘राजस्थान’ला

यापुर्वीच्या अभ्यास दाै-यांचे अहवाल गुलदस्त्यात ;  महिला व बालकल्याण समितीचे जनतेच्या पैशावर दाैरे नव्हे केवळ माैजमजा 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीसह सर्व सदस्य फेब्रुवारी महिन्यात राजस्थान दाै-यावर जाणार आहे. त्याचा ठराव आज (शुक्रवारी) झालेल्या सभेत करण्यात आला. सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी यापुर्वी केलेल्या अभ्यास दाै-याचा अहवाल सादर केलेले नाहीत. त्यामुळे करदात्या नागरिकांच्या पैशावर विविध समितीचे पदाधिकारी व अधिकारी अभ्यास दाैरे नव्हे तर केवळ माैजमजा करु लागल्याचे दिसून येत आहे. 

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे सत्ताधारी भाजप सत्तेवर येताच करदात्या नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करणार नाही, याकरिता महापालिकेची दैनंदिन डायरी छापणे बंद केले. उद्घाटने, भूमिपुजन निमंत्रण पत्रिका छापणेही बंद केले. याशिवाय काही नगरसेवकांनी वाहनभत्ता स्विकारणे देखील बंद केले. यावर अनेक भाजप पदाधिका-यांनी आम्ही महापालिकेतील करदात्या नागरिकांचा पैशा वारेमाप खर्च करणे बंद केले असून त्या पैशातून नागरिकांच्या उपयोगी कामे करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत होते.

सत्ताधारी भाजपच्या विविध समितीतील अनेक सभापती व सदस्यांचे अभ्यास दाै-यांच्या नावावर दाैरे सुरुच आहेत. त्या आता महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व सदस्य देखील आता राजस्थान दाै-यावर निघणार आहेत. ते जानेवारी महिन्यातच जाणार होते. मात्र, पवनाथडी जत्रा आयोजनामुळे त्याचा हा दाैरा लांबणीवर पडला होता. आता फेब्रुवारी महिन्यात महिला व बालकल्याण समितीच्या सभेत करण्यात आला आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button