breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अधिकृत स्टॉलवर कारवाई केल्याने दिव्यांगाचे पालिकेवर आंदोलन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – निगडीतील भक्ती-शक्ती चौकात दिव्यांगांच्या अधिकृत स्टॉलवर कारवाई केल्याने संतप्त दिव्यांगांनी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर आज सोमवारी (दि. 15) आंदोलन सुरू केले आहे. कारवाई करणा-या अतिक्रमण निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, रफिक खान, लॉरेन रिस्लुवा, संगीता जोशी, लता गु-हाटे, ज्ञानदेव नारकडे आंदोलनात सहभागी आहेत. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात दिव्यांग नागरिकांचे अधिकृत स्टॉल आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने २५ सप्टेंबर रोजी स्टॉलवर कारवाई केली. हे स्टॉल्स अधिकृत असताना पालिकेने कारवाई करून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. त्यामुळे संबंधित विभागातल्या अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button